शेतकऱ्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे नाही घेतले तर जय मल्हार क्रांती संघटना आंदोलन करणार - दादासाहेब पवार
शिरूर- कार्यकारी संपादक; सुदर्शन दरेकर
शिरूर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय या ठिकाणी 13/ 05/ 2025 रोजी विनायक लक्ष्मण फडके यांनी शेतकऱ्यांनी गट नंबर 223 मधून तीन डंपर ,आठ ते दहा ब्रास माती चोरी केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती तथापी सदर गट नंबर 223 मधून कोणतीही चोरी झालेली नसताना माती चोरी केल्याची खोटी तक्रार फिर्यादी विनायक फडके यांनी शिंदोडी येथील सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या विरुद्ध खोटी फिर्याद दिलेली असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळेस जय मल्हार क्रांती संघटना व शिंदोडी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे या कामी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख व गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत स्वतः पोलीस निरीक्षक यांनी पाहणी करून पंचनामा करून दिलेल्या खोट्या फिर्यादीचा तपास करणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळेस करण्यात आली.
सदरचा फिर्यादी हा जाणीवपूर्वक सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याकरता खोट्या फिर्यादी देत असल्याने सदर फिर्यादी बाबत कसुन चौकशी करून निर्दोष शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करून फिर्यादीने दिलेल्या खोट्या फिर्यादीवर कारवाई करावी व सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा व स्थळ पाहणी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख व गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत करावी अन्यथा समस्त गावकरी व जय मल्हार क्रांती संघटना शिरूर पोलीस स्टेशन विरुद्ध आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी शिंदोडी गावचे सरपंच अरुण दौलतराव खेडकर, जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार, शिंदोडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष इंद्रभान ओव्हाळ, दौलतराव खेडकर, गंगाराम माने ,मुक्ताजी लटके, गौतम गायकवाड, राजेंद्र खेडकर, उमाजी माने, अण्णा माने, उत्तम गायकवाड, बिरू चोरमले, बाजीराव माने, एकनाथ सरके, मीराबाई ओव्हाळ, तात्या भाऊ ओवाळ इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

